कोरोना आणि सण

    भारत आणि भारतीय सण यांच्यातील नातं म्हणजे अमूल्य आणि वाखाणण्याजोगे आहे. सणानिमित्त एकत्र येणे,बंधुता एकता जपणे,हास्य व्यवहार प्रेमाचे फुलोरे उमलवण्यासाठी आपले सण समारंभ प्रमुख कार्यरत आहेत.बहिण भावाच्या अतूट नाट्याला जपण्यासाठी त्याची महती अधोरेखित करण्यासाठी केला जाणारा नारळी पौर्णिमा/राखी पौर्णिमा,रंगाची उधळण करणारी होळी,देवीचे अनन्यसाधारण महतीचे दर्शन देणारी नवरात्र,नात्यातील कडवटपणा दूर करणारी संक्रांति,कापणीच्या जल्लोषात करता होणारा पोंगल,शेतकरी आणि बैल राजा यांच्यातला मैत्री करता होणारा पोळा,दिव्यांचा साजशृंगारात साजरी होणारी दिवाळी, पारसी बांधवांची पतेती तसेच ईद,क्रिसमस असे कित्येक सण भारतीय एकत्र येऊन ढोलताशाच्या नगाड्यात,फटाक्यांच्या धडाक्यात नातेवाईकांच्या सोबतीने,मोठ्यांच्या आशीर्वादाने,देवाला नमन करीत एकत्र साजरी करतात.                                        पण 24 मार्च 2020 रोजी आपल्या सण-उत्सवाला आळा बसला.कोरोणा हळूहळू जगभरात थैमान मांडू लागला आणि बघता बघता त्याची झळ भारत व भारतवासिंयांना लागली.मृत्यू दर वाढला,घरोघरी शोकाकुला ऐकू येऊ लागली या महामारी ला आटोक्यात आणण्यासाठी त्वरित तात्पुरता उपाय म्हणून देशोदेशी लॉकडाऊन होऊ लागले तसेच भारतातही लॉकडाऊन लागले. रस्त्यावर बघता बघता शांतता पसरू लागली पाच-दहा दिवसांचा लॉकडाऊन बघता बघता तीन-चार महिन्याच्या वर जाऊ लागला आपल्या माणसांच्या भेटीचे क्षण कमी होऊ लागले. प्रत्येक जण व्याकुळतेने, महामारीच्या भितीने आणि सरकारच्या आदेशाने घरात चिडीचूप बसले. एकमेकांना भेटणे,फिरणे,आऊटिंगला जाणे, इतपत शाळा बंद केल्या गेल्या आता तर भेटी सुद्धा वर्च्युअल झाल्या.दिवाळी पहाट ला होणारा ढोल-ताशाचा नाद ऐकण्यासाठी कान तरसू लागले,नवरात्रीला गरबा खेळण्यासाठी पाय तरसू लागले,दिवाळीला फटाके फोडण्यासाठी एकटेपणा जाणवू लागला, होळीच्या धूळवणासाठी मन तरसू लागले.मुळात जेवनात जसे मिठाची कमी लगेच भासते तसेच भारतीयांना सणांचे खरी मजा भेटीगाठी यांच्या उणीवा भासू लागल्या. पण याला कारणही तर तसेच होते कोरोणाचे वाढते थैमान त्यातून न ऐकणारी जनता यात सरकार तरी काय करणार लॉकडाऊन वर लॉकडाऊन लागत गेले आणि आपले सणवार सरत गेले.                                                                                                                               पण तरीदेखील भारतीय खचले नाही यावेळी त्यांनी दिवाळीचा फराळ गोरगरीबांन्ना दिला, सत्यनारायणाच्या पूजेला होणारा नैवेद्याचा व त्याचा जेवणाचा थाट त्यांनी भिकारी तसेच अनेक गरजूंना वाटले.गेल्या वर्षीपासून नातेवाईकांसोबत सण जरी आम्हाला साजरा करता आला नसला तरीदेखील आम्ही वर्च्युअली एकमेकांच्या सान्निध्यात होतो एकमेकांच्या सहवासात होतो. भेटीगाठी नक्कीच थांबल्या असतील पण मनाने आम्ही एकत्र होतो.कुठेतरी यावेळी सणांची खरी महती त्याला साजरी करण्याची खरी पद्धत यावर्षी आम्हाला नक्कीच कळली आहे, कारण या वेळी आम्ही सण साजरे करताना जेवढे पैशाची धुळवण करतो त्यातली फूल ना फुलाची पाकळी एवढी मदत आज भारतीयांनी एकमेकांना नक्कीच केली आहे आणि हे फ्कत पोकळ शब्द नसून आम्हा भारतीय बंधुंना आमच्या भारतीय बंधूंवर हा असलेला विश्वास आहे आणि देवा चरणी हीच प्रार्थना आहे की जगा वर आलेले हे संकट लवकरच संपुष्टात येऊदे आणि आम्हाला आमच्या सणावारांची खरी मजा लुटायची संधी परत एकदा भेटू दे.

Something Wrong Please Contact to Davsy Admin

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *